देशात वाघांपाठोपाठ आता बिबट्यांच्या संख्येतही वाढ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात वाघांपाठोपाठ आता बिबट्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या नागरीकांचं अभिनंदन केलं आहे.

हे प्रयत्न असेच सुरु ठेवले पाहिजे आणि प्राण्यांना सुरक्षित निवारा मिळाला पाहिजे, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. देशात सध्या १२ हजार ८५२ बिबटे आहेत. २०१४ च्या तुलनेत बिबट्यांच्या संख्येत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.