जीएसटी भरण्यासाठीची मुदत वाढवण्याची कर संघटना आणि व्यापाऱ्यांची मागणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे देशामध्ये लॉकडाऊन असल्यानं कर लेखापरीक्षण अहवाल, जीएसटी विवरणपत्रं भरण्यासाठी पुरेसा अवधी न मिळाल्यानं ते भरण्यासाठीची मुदत वाढवण्याची मागणी विविध कर संघटना आणि व्यापाऱ्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवून केली आहे. उद्या ही मुदत संपणार आहे.