सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विशेष निर्णयामुळे ‘त्या’ दोन्ही विद्यार्थिनींना मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ

  स्वाधार योजनेसाठी ३५ कोटी रुपये निधी सामाजिक न्याय विभागाकडून वितरित – मंत्री धनंजय मुंडे

मुंबई : परदेश शिष्यवृत्तीसंदर्भात दोन विद्यार्थिनींना भेडसावत असलेली समस्या जाणून घेतल्यानंतर विशेष बाब म्हणून या दोन विद्यार्थिनींना परदेश शिष्यवृत्ती मिळण्यासंदर्भात विशेष आदेश निर्गमित करण्याचे निर्देश सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. या निर्णयामुळे या दोन विद्यार्थिनींना परदेश शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

कु. तेजस्वी लक्ष्मण शिंदे ही सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील अंगापूर येथील प्रतिभावंत विद्यार्थिनी ‘स्पेस सायन्स’ अर्थात अंतराळ विज्ञान शाखेत ऑस्ट्रेलिया येथील विद्यापीठात पीएचडीचे शिक्षण घेत असून, जगभरातील निवडक १५० विद्यार्थ्यांपैकी हा बहुमान मिळालेली ती एक विद्यार्थिनी आहे. ऑस्ट्रेलियन विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे तिला देय असलेली शिष्यवृत्तीची रक्कम परदेश शिष्यवृत्तीच्या मिळणाऱ्या रकमेतून वजा करण्याचा मूळ नियम आहे. परंतु कु. तेजस्वीने आर्थिक परिस्थिती पाहता परदेश शिष्यवृत्तीची पूर्ण रक्कम मिळावी, जेणेकरून तिच्या परदेशातील शिक्षण व उदरनिर्वाहास अडचण येणार नाही, अशी विनंती सामाजिक न्याय विभागाकडे केली होती, ही बाब श्री. मुंडे यांना समजताच परदेश शिष्यवृत्ती योजनेतील देय असलेला पूर्ण लाभ या विद्यार्थिनीस देण्यात यावा असा आदेशच श्री. मुंडे यांनी  निर्गमित केल्याने तेजस्वीच्या आनंदाला पारावार उरला नाही.

मुलींचे शिक्षण व सक्षमीकरण करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या श्री. मुंडे यांचे मी मनःपूर्वक आभार मानते. तुमच्यामुळेच माझ्या स्पेस सायन्स पीएचडीची वाट मोकळी होऊ शकली, अशा शब्दात तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात नागपूर येथील कु. स्नेहा काशीनाथ घोडेस्वार या विद्यार्थिनीला ऑस्ट्रेलियामधील सिडनी विद्यापीठात मास्टर ऑफ इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला होता व ती परदेश शिष्यवृत्तीस पात्र ठरली होती, मात्र सदर विद्यापीठाने ऐनवेळी तिच्या जागी दुसऱ्या विद्यार्थ्यास प्रवेश दिल्याने स्नेहासमोर समस्या उभी राहिली.

शिष्यवृत्ती योजनेच्या नियमांचा विचार करत, ऑस्ट्रेलियामधील ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय विद्यापीठात मास्टर ऑफ इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवत तिने शिष्यवृत्ती लागू व्हावी याबाबत विनंती केली होती. त्यानुसार श्री. धनंजय मुंडे यांनी विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याचा विचार करत तातडीने विशेष बाब म्हणून निर्णय घेत बदललेल्या विद्यापीठातील बदललेल्या कोर्ससाठी परदेश शिष्यवृत्ती लागू करण्याचा निर्णय घेतल्याने स्नेहाच्या चेहऱ्यावर हसू उमलले.

कु. स्नेहा घोडेस्वार हिने आपल्या मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रवेशासह परदेश शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिल्याबद्दल श्री. मुंडे यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीत, अशा भावना व्यक्त केल्या.

Popular posts
जगात कुठे ही नसतील इतक्या वेगानं आणि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या, मुख्यमंत्र्यांच प्रतिपादन
Image
आमदार लक्ष्मण जगताप म्हणतात, हे तर मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार; खासगी रुग्णवाहिकांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने संचलन करावे
Image
पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा लॉकडाऊन विरोध : भाजपाचा व्यापाऱ्यांना पाठिंबा
Image
आर्थिक आणि नियामक धोरणांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेतली तूट भरून निघण्यास मदत होईल- आरबीआय
Image
महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांची वज्रमुठ बांधावी : ॲड. सचिन भोसले
Image