कीटकनाशके कृषि विक्रेत्यांकरीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम

पुणे:- राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्थान यांच्यामार्फत कीटकनाशके कृषि विक्रेत्यांकरीता 3 महिन्याचा कीटकनाशक व्यवस्थापनाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course On Insecticide Management) सुरू करण्यात आला असल्याची माहिती प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे यांनी दिली आहे.

हा अभ्यासक्रम राबविण्यासाठी कृषि महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रांची नोडल प्रशिक्षण संस्था म्हणून निवड करण्यात येणार आहे. ज्या कीटकनाशके विक्रेत्याकडे शैक्षणिक अर्हता नाही त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम आवश्यक आहे. हा कोर्स १२ आठवडयांचा असून आठवडयातील एक दिवस (६ तास/ दिवस) यानुसार एकूण ७२ तासाचा असून विनाअनुदानित तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रति प्रशिक्षणार्थी रुपये ७ हजार ६०० इतके शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

हा कोर्स राबविण्यासाठी नोडल प्रशिक्षण संस्थेची निवड करण्याची प्रक्रिया सुरू असून यामध्ये कृषि क्षेत्रात प्रशिक्षण देणा-या मान्यता प्राप्त संस्था, विभागीय कृषि संशोधन केंद्रे, शासकीय तसेच खाजगी कृषि फलोत्पादन महाविद्यालये यांना नोडल प्रशिक्षण संस्था म्हणून अर्ज करता येईल. सद्यस्थितीत कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांची नोडल प्रशिक्षण संस्था म्हणून निवड झालेली आहे.

विहित नमुन्यातील अर्ज पूर्णपणे भरून डिलरची संपूर्ण माहिती, कीटकनाशक परवाना प्रत वैधता इत्यादी साक्षांकित प्रती व ३ पासपोर्ट साईज फोटो नोंदणीच्या वेळी आवश्यक राहतील. जास्तीत जास्त कीटकनाशक विक्रेत्यांनी अभ्यासक्रमासाठी त्यांच्या नजीकच्या नोडल प्रशिक्षण संस्थेकडे संपर्क साधून नोंदणी करावी व अभ्यासक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे यांनी केले आहे. पुणे, दि. 21 :- राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्थान यांच्यामार्फत कीटकनाशके कृषि विक्रेत्यांकरीता 3 महिन्याचा कीटकनाशक व्यवस्थापनाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course On Insecticide Management) सुरू करण्यात आला असल्याची माहिती प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे यांनी दिली आहे.

हा अभ्यासक्रम राबविण्यासाठी कृषि महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रांची नोडल प्रशिक्षण संस्था म्हणून निवड करण्यात येणार आहे. ज्या कीटकनाशके विक्रेत्याकडे शैक्षणिक अर्हता नाही त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम आवश्यक आहे. हा कोर्स १२ आठवडयांचा असून आठवडयातील एक दिवस (६ तास/ दिवस) यानुसार एकूण ७२ तासाचा असून विनाअनुदानित तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रति प्रशिक्षणार्थी रुपये ७ हजार ६०० इतके शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

हा कोर्स राबविण्यासाठी नोडल प्रशिक्षण संस्थेची निवड करण्याची प्रक्रिया सुरू असून यामध्ये कृषि क्षेत्रात प्रशिक्षण देणा-या मान्यता प्राप्त संस्था, विभागीय कृषि संशोधन केंद्रे, शासकीय तसेच खाजगी कृषि फलोत्पादन महाविद्यालये यांना नोडल प्रशिक्षण संस्था म्हणून अर्ज करता येईल. सद्यस्थितीत कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांची नोडल प्रशिक्षण संस्था म्हणून निवड झालेली आहे.

विहित नमुन्यातील अर्ज पूर्णपणे भरून डिलरची संपूर्ण माहिती, कीटकनाशक परवाना प्रत वैधता इत्यादी साक्षांकित प्रती व ३ पासपोर्ट साईज फोटो नोंदणीच्या वेळी आवश्यक राहतील. जास्तीत जास्त कीटकनाशक विक्रेत्यांनी अभ्यासक्रमासाठी त्यांच्या नजीकच्या नोडल प्रशिक्षण संस्थेकडे संपर्क साधून नोंदणी करावी व अभ्यासक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे यांनी केले आहे.

Popular posts
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताची ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी
Image
मुंबईत लॉकडाऊनच्या दुसरा दिवशी व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण
Image
आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image
देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
Image
येत्या तीन वर्षात सुमारे ३६ हजार ५०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं लोकसभेत प्रतिपादन
Image