राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक २९ शतांश टक्के

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २ हजार १२४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख ९ हजार ९४८ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक २९ शतांश टक्के झाला आहे. काल ३ हजार ३१४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १९ लाख १९ हजार ५५० झाली आहे.

सध्या राज्यात ४ लाख ६० हजार ७०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल ६६रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूणसंख्या, ४९ हजार २५५ झाली असून, मृत्यू दर २ पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका आहे. मुंबईत काल ४९३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आलं.

आतापर्यंत २ लाख ७० हजार ६२८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल ५७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत रुग्णांची संख्या २ लाख ९० हजार ९१४ झाली आहे.

मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी ३६४ दिवसांवर पोचला आहे. सध्या ८ हजार ३५५ रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईतला मृतांचा आकडा ११ हजार ७६वर पोचला आहे.