विश्व मराठी ऑनलाइन संमेलनानिमित्त लेखन कार्यशाळांचे आयोजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : जानेवारीत होणाऱ्या विश्व मराठी ऑनलाइन संमेलनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विश्व मराठी परिषदेने सात नि:शुल्क लेखन कार्यशाळांचे आयोजन केले आहे. उद्यापासून या कार्यशाळा सुरू होणार आहेत. त्यामध्ये भारतातील सर्व राज्यांसह ३५ देशातील मराठी भाषिकांना सहभागी होता येणार आहे.

या कार्यशाळांमध्ये भारत सासणे, लीना सोहोनी, डॉ. उमा कुलकर्णी, नीलिमा बोरवणकर, प्रा. क्षितिज पाटुकले, संजय सोनवणी, मोनिका गजेंद्रगडकर, आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी www.vishwamarathiparishad.org/sammelan-nondani  इथे नोंदणी करता येईल.