पुणे विभागातील 5 लाख 35 हजार 744 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात कोरोना बाधित 5 लाख 60 हजार 717 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

 https://ekachdhyeya.com/wp-content/uploads/2020/11/NPIC-20201128153518-667x420.jpg

पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 35 हजार 744 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 60 हजार 717 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 9  हजार 396 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 577 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.55 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 60 हजार 758 रुग्णांपैकी 3  लाख 44 हजार 912 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7  हजार 161 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 685  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.41 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  95.61 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 54 हजार 100 रुग्णांपैकी 51 हजार 524 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  820 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 874 रुग्णांपैकी 45 हजार 13 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1  हजार 153 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 708  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

सांगली जिल्हा

सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 47  हजार 505 रुग्णांपैकी 45 हजार 588 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 189 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1  हजार 728 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 49 हजार 480 रुग्णांपैकी 47  हजार 707 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  73 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार  700  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 771 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 564 , सातारा जिल्ह्यात ९६, सोलापूर जिल्ह्यात 78, सांगली जिल्ह्यात 17 तर कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण - 

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 807 आहे. पुणे जिल्हयामध्ये 705, सातारा जिल्हयामध्ये 0, सोलापूर जिल्हयामध्ये 68, सांगली जिल्हयामध्ये 20 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 14 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 32 लाख 60 हजार 972 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  5 लाख  60 हजार 717 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 27 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Popular posts
जगात कुठे ही नसतील इतक्या वेगानं आणि संख्येनं आपण महाराष्ट्रात आरोग्य सुविधा उभ्या केल्या, मुख्यमंत्र्यांच प्रतिपादन
Image
आर्थिक आणि नियामक धोरणांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेतली तूट भरून निघण्यास मदत होईल- आरबीआय
Image
आमदार लक्ष्मण जगताप म्हणतात, हे तर मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा घृणास्पद प्रकार; खासगी रुग्णवाहिकांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने संचलन करावे
Image
पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा लॉकडाऊन विरोध : भाजपाचा व्यापाऱ्यांना पाठिंबा
Image
महानगरपालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांची वज्रमुठ बांधावी : ॲड. सचिन भोसले
Image