जागतिक मध्यवर्ती बँकांकडून अतिरिक्त मदतीच्या आशेने सोन्याच्या दरात वाढ


मुंबई: जागतिक मध्यवर्ती बँकांकडून अतिरिक्त मदतीच्या आशेने स्पॉट गोल्डचे दर ०.८% नी वाढले व १८७६.५ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. यामुळेही पिवळ्या धातूचे आकर्षण वाढले. मध्यवर्ती बँका अर्थव्यवस्थांना साथपूर्व स्थितीत नेण्यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे. यामुळेही सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याला लाभ मिळाला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या सांगितले.


फायझर इंक कंपनीकडून कोव्हिड-१९ लसीसंदर्भात अपेक्षा वाढल्याने गुंतवणुकदारांमध्ये आशादायी वातावरण निर्माण झाले यामुळेही सोन्याच्या किंमतीवर  परिणाम झाला. लसीच्या यशस्वी चाचण्या आणि सुरक्षेची फार काळजी नसल्याने आता कोरोना विषाणूवर लस मिळण्याची आशा बाजारातील व्यापा-यांमध्ये वाढली.


जागतिक मध्यवर्ती बँकांकडून कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात आणखी मदत मिळण्याच्या अपेक्षेने सोन्याच्या दरांना आधार मिळाला. आजच्या व्यापारी सत्रात सोन्याचे दर उच्चांकी स्थिती गाठण्याची अपेक्षा आहे.


Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image