पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा - विभागीय आयुक्त सौरभ राव


पुणे : पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सोमवारी (दि. 2) जाहीर झाली आहे. त्याची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ यांनी दिल्या.


विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक विभागाच्या सर्व अधिका-यांची बैठक विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपायुक्त प्रताप जाधव आणि निवडणूक यंत्रणेशी सबंधित अधिकारी उपस्थित होते.


आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या सर्व सूचना, कोविड 19 च्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी आदींबाबत आयुक्त राव यांनी सूचना केल्या. प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात यावी तसेच अचूक, शास्त्रोक्त व समन्वयाने वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त राव यांनी दिल्या. बैठकीत श्री. जाधव यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली.


Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image