व्हिजाची डिजिटसिक्योर व एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी
• महेश आनंदा लोंढे
मुंबई: पेमेंट टेक्नोलॉजीतील जागतिक लीडर असलेल्या व्हीजाने डिजिटसिक्योअर आणि एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी करत आज पीसीआय सर्टिफाइड टॅप टू फोन कार्ड सिस्टिम जगात सर्वात प्रथम लागू करण्याची घोषणा केली आहे. डिलिव्हरीप्लस अशी ही सिस्टिम सुरू करणारी ही पहिली कंपनी असेल आणि एचडीएफसी बँक अधिग्रहणकर्ता असेल. ही सिस्टिम कंपन्या आणि व्यापा-यांना कोणत्याही कार्ड किंवा डिव्हाइसविना आपल्या एनएफसी इनेबल्ड अँड्रॉइड स्मार्टफोनच्या मदतीने सुरक्षितरित्या तत्काळ काँटॅक्टलेस पेमेंट स्वीकरण्यास मदत करेल. मेक इन इंडियाच्या धर्तीवर स्थानिक प्रयोगांना प्रोत्साहन देत डिजिटसिक्योर आशिया पॅसिफिक क्षेत्रातील पहिली कंपनी बनली आहे, जिला ही टेक्नोलॉजी लागू करण्यासाठी पीसीआय सिक्योरिटी सर्टिफिकेशन मिळाले आहे.
डिजिटसिक्योअरचे सीईओ शेशाद्री कुलकर्णी म्हणाले, “ आता लहान आणि मोठ्या व्यापा-यांना ग्राहकांसाठी काँटॅक्टलेस पेमेंट स्वीकार करणे अनिवार्य होत आहे. डिजिटसिक्योरचे पीसीआय सर्टिफाइड अॅप फर्स्ट सॉफ्टपीओएस प्लॅटफॉर्मसह वित्तीय संस्था, व्यापा-यांना कार्ड पेमेंट स्वीकारण्याची सुविधा देऊ शकेल. यामुळे व्यवहाराचा खर्च आणि वेळही वाचेल.
व्हीजाचे इंडिया व साउथ एशियातील मर्चंट सेल्स अँड अॅक्वायरिंग हेड, शैलेश पॉल म्हणाले, “या साथीच्या आजारामुळे व्यवसायांना सुरक्षित आणि काँटॅक्टलेस पेमेंट स्वीकारण्याची गरज भासू लागली आहे. ५ कोटी लहान व्यावसायांना डिजिटल बनवण्याची जागतिक वचनबद्धता पाळत आम्ही एचडीएफसी बँक आणि डिजिटसिक्योरसोबत भागीदारी करत पीसीआय सर्टिफाइड टॅप टू फोन कार्ड सिस्टिम प्रथमच डिप्लॉय करताना खूप आनंदित होत आहोत. यामुळे अधिक व्यापा-यांना सोपी आणि कमी खर्चातील सिस्टिम मिळेल.
टॅप टू फोन टेक्नोलॉजी व्यापारी आणि कंपन्यांना अशा पीसीआय सर्टिफाइड क्लाउड आधारित पेमेंट सिस्टिममध्ये सहभागी करत वित्तीय संस्था संचालनाचा खर्च खूप कमी करेल. यामुळे बँक आणि फिनटेक कंपन्यांना अधिक व्यापा-यांना कार्ड पेमेंट स्वीकारण्यास मदत करता येईल. कार्डधारक कोणत्याही व्यापाऱ्याच्या स्मार्टफोनवर टॅप करून सहज आणि सुरक्षित काँटॅक्टलेस पेमेंट करू शकतील. ही सिस्टिम लागू झाली तर व्यापाऱ्यांना काँटॅक्टलेस कार्ड पेमेंट स्वीकार करण्यासाठी व्हीजा टॅप टू फोन टेक्नोलॉजी उपलब्ध करून देणारा भारत १५ वा देश ठरेल.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.