सणाचा आनंद घेताना आरोग्याच्या जबाबदारीचं भान ठेवण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं जनतेला आवाहन


मुंबई (वृत्तसंस्था) : सणाचा जरूर आनंद घ्या पण आरोग्याच्या जबाबदारीचं भान ठेवा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना केलं आहे. आपण स्वत:ही केवळ सोशल मिडीया, ईमेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे, घरच्या घरी हा सण साजरा करणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं.

गेल्या सात-आठ महिन्यात आपण सर्व धर्मियांचे सण, उत्सव अतिशय सावधपणे आणि नियमांचं पालन करून साजरे केले आहेत. आपण जो संयम पाळला आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण या महामारीला इतक्या महिन्यानंतरही रोखून धरण्यात यशस्वी झालो असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद
कॅटरिंग ब्रँड फीस्टलीचा मुंबईत प्रवेश
Image