महिला व बालविकास विभागामार्फत उद्या बालदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन


मुंबई : बालदिनानिमित्त महिला व बालविकास विभागाने मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या दि.12 नोव्हेंबर रोजी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.


सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी ज्युवेनाईल जस्टीस सॉफ्टवेअरबाबत सादरीकरण, या सॉफ्टवेअरमधील ज्युवेनाईल जस्टीस बोर्ड मॉड्युल आणि बालकल्याण समितीसाठी तयार करण्यात आलेल्या आदर्श कार्यपद्धतीचे अनावरण करण्यात येणार आहे. बाल लैंगिक शोषणाच्या अनुषंगाने चांगला स्पर्श, वाईट स्पर्श अर्थात ‘गुड टच, बॅड टच’ या विषयाबाबत युनिसेफकडून सादरीकरण होणार आहे.


राज्यात कोविड कालावधीमध्ये विशेष काम केलेल्या आणि सेवा दिलेल्या  महिलांचा गौरव, बालविवाह प्रतिबंध कामात विशेष कार्य केलेल्या अधिकारी-कर्मचारी आणि संस्थांचा सत्कार, राजमाता जिजाऊ माता-बाल पोषण अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.


कार्यक्रमास महिला व बाल विकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो, महिला व बाल विकास आयुक्त हृषिकेश यशोद आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
राज्यातल्या शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंपांना वीज जोडणीचं राज्य सरकारचं नवीन धोरण जाहीर
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
संसद, न्यायपालिका आणि प्रशासन संविधानामुळे मजबूत असल्यानं कठिण परिस्थितही सामान्य नागरिकांचा या तीन संस्थांवर दृढ विश्वास असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image