मुंबईतला कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी १७१ दिवसांवर


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल १ हजार ७१६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २ लाख २९ हजार ५३८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ९०८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, आतापर्यंत रुग्णांची संख्या २ लाख ५८ हजार ४०८ झाली आहे.

  मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी १७१ दिवसांवर गेला आहे. काल २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा १० हजार २७५ वर पोहचला आहे. सध्या १८ हजार २६ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.