ससून रुग्णालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा


पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिनस्त 20 शय्या आयुर्वेदीक कक्षात ‘५ वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ साजरा करण्यात आला. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मुरलीधर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवात धन्वंतरी पूजनाने झाली.


यावेळी आयुर्वेद विभागाचे विभाग प्रमुख वैद्य व्यंकट धर्माधिकारी तसेच श्री लक्ष्मण लावगनकर, श्रीमती अर्पणा सोल, रिया बोन्तापले, डॉ.हरिश, डॉ.सपना यादव आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.


याप्रसंगी बोलताना डॉ.मुरलीधर तांबे यांनी कोवीड-19 विषयी आयुर्वेद योगदानाची माहिती दिली आणि आयुर्वेद संशोधनासंदर्भात आयुर्वेद डॉक्टरांनी पुढे येऊन काम करावे, असे आवाहन केले. आयुर्वेद विभागाचे विभाग प्रमुख वैद्य व्यंकट धर्माधिकारी यांनी आयुर्वेदिक कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच सर्वांनी आयुर्वेदातील दिनचर्या, ऋतूचर्या, आहार इत्यादी बाबींचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले.  आभार अर्पणा सोले यांनी मानले.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image