एसटीच्या प्रवाशांना स्वस्त दरात “नाथजल” या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण


मुंबई (वृत्तसंस्था) : एसटीच्या प्रवाशांना स्वस्त दरात, दर्जेदार शुद्ध पाणी मिळावं या उद्देशानं “नाथजल” या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण परिवहन मंत्री आणि एस.टी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या हस्ते काल झालं. या योजनेअंतर्गत महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकावर महामंडळाचं अधिकृत बाटलीबंद पेयजल उपलब्ध करून दिलं जात आहे.


सर्व बस स्थानकांवर 650 मिलीमीटर आणि 1 लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये हे “नाथजल” विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. बसस्थानकांवर इतर कोणत्याही कंपन्यांचे पेयजल  विकायला बंदी असेल.