देशभरात काल कोविडचे ४२ हजार रुग्ण बरे


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ५६ शतांश टक्के इतका झाला आहे. काल देशभरात कोविडचे ४२ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत देशात ७९ लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या ५ लाख ५ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल ३८ हजार ७४ नवीन कोरोनाबाधित आढळल्यानं देशभरातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८५ लाख इतकी झाली आहे. काल ४४८ रुग्णांचा मृत्यू झाला.

देशाचा कोरोना मृत्यूदर सध्या १ पूर्णांक ४८ शतांश टक्के इतका आहे. कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी आखलेली रणनीती, कोरोनाबाधितांचा शोध, चाचण्या आणि उपचार यामुळे रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.