मुंबईत आतापर्यंत २ लाख ३७ हजार २९ रुग्ण कोरोनामुक्त


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ५०७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडलं. आतापर्यंत २ लाख ३७ हजार २९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले  आहेत. गेल्या २४ तासांत ५९९ नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे रुग्णांची संख्या २ लाख ६५ हजार १४२ झाली आहे.


मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी २२९ दिवसांवर पोचला आहे. सध्या १६ हजार ९२३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. काल २० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा १० हजार ४६२ वर पोचला आहे.