विद्यार्थ्यांच्या भावनिक स्वास्थ्यासाठी आयआयटी संस्थेतर्फे वेबसाइटची निर्मिती


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या आयआयटी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांच्या भावनिक स्वास्थ्यासाठी एका वेबसाइटची निर्मिती करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते आज या वेबसाइटचं उद्घाटन झालं.

  बंधू या वेबसाइटमुळे विद्यार्थ्यांना ताण विरहित शिक्षण घेता येऊ शकेल असा विश्वास धोत्रे यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यार्थी हा कोणत्याही चांगल्या शैक्षणिक संस्थेचा केंद्रबिंदू असतो. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वेबसाईट सुरु करून आयआयटीन चांगलं काम केलं आहे, असंही ते म्हणाले.