महिलांविरोधातले अत्याचार रोखण्यासाठी राज्यात दिशा कायदा पारित करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांचं प्रतिपादन


मुंबई (वृत्तसंस्था) : महिलांविरोधातले अत्याचार रोखण्यासाठी येत्या अधिवेशनात राज्यात तामिळनाडूच्या धर्तीवर दिशा कायदा पारित करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते आज नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथं विष्णू नारायण मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमानंतर झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. 

रावेर प्रमाणे सारंगखेडा इथं झालेल्या मुलीच्या हत्या प्रकरणाचा  खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातलं महाआघाडीचं  सरकार मजबूत असून, ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. 


Popular posts
दक्षिणी कमांड खुली ऑनलाईन स्पर्धा
Image
खाताबुकचे 'पगारखाता' अ‍ॅप
Image
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image