कॅटरिंग ब्रँड फीस्टलीचा मुंबईत प्रवेश


 

मुंबई: भारतातील अग्रेसर फूड टेक कंपनी फीडिंगबिलियन्स बी२बी कॉन्ट्रॅक्ट कॅटरिंग ब्रँड फीस्टलीद्वारे देशातील कर्मचा-यांना आरोग्यदायी जेवणाचा पर्याय प्रदान करीत आहे. फीस्टलीने आपली पोहोच आणखी विस्तारत आता मुंबई शहरात प्रवेश केला आहे. हा ब्रँड सध्या दिल्ली-एनसीआर आणि नव्याने समाविष्ट झालेल्या मुंबईसह उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि राजस्थानसह सहा मजबूत ठिकाणी सेवा देत आहे. फीस्टली मुंबईत नेल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत काम करणार असून येत्या काही महिन्यात मुंबईतील मोठ्या औद्योगिक कँटीन किंवा मेस मॅनेजमेंट प्लॅटफॉर्ममध्ये स्मार्ट मिल सोल्युशन देण्याचे फीस्टलीचे उद्दिष्ट आहे.

२०१७ मध्ये स्थापन झालेली फीस्टली फॉर्च्युन ५०० कंपन्यांच्या कर्मचा-यांसाठी आरोग्यदायी जेवणाचा पर्याय दररोज प्रदान करीत असून कंपनीने आतापर्यंत ३ दशलक्षहून अधिक कर्मचा-यांना जेवण पुरवले आहे. २०२२ पर्यंत मुंबईत दरवर्षी १ दशलक्षपेक्षा अधिक कर्मचा-यांना जेवण पुरवण्याचे फीस्टलीचे लक्ष्य आहे. कंपनीने सेवा दिलेल्या काही ग्राहकांमध्ये सॅमसंग, पेटीएम, एचसीएल, युबीईआर, एअरटेल, नोकिया, आयडिया, हॅवेल्स आणि आयआरसीटीसीचा समावेश आहे.

फीस्टली बाय फीडिंगबिलियन्सचे संस्थापक आणि सीईओ सार्थक गहलोत म्हणाले, 'कार्यस्थळी कर्मचा-यांच्या जेवणाचा अनुभव नव्याने मांडण्यासाठी वचनबद्ध असल्याने फीडिंग बिलियन्सची वृद्धी होत आहे. आतापर्यंतचा प्रवास लाभकारक ठरला असून देशातील विविध ग्राहकांशी जोडले गेल्याने कंपनीला बाजारपेठेचाही मोठा आधार मिळाला, हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. मुंबईत आमच्या सर्व पाहुण्यांना उत्कृष्ट अनुभव प्रदान करण्यावर भर देऊन कॉन्ट्रॅक्ट केटरिंग कॅप्चर करणे तसेच आरोग्यदायी मेनू प्रदान करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image