राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ७५ शतांश टक्क्यावर


 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सहा हजार ६०८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १६ लाख ३० हजार १११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९२ पूर्णांक ७५ शतांश टक्के इतका आहे. काल आणखी पाच हजार ११ कोरोना बाधितांची नोंद झाली.

  त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १७ लाख ५७ हजार ५२० झाली आहे. सध्या ८० हजार २२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.काल १०० जणांचा उपचारादरम्यान मृत्यूझाला. राज्यात या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४६ हजार २०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.