९वी ते १२वी पर्यंत शाळा सुरु करण्यास परवानगी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनानं मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातल्या नववी ते बारावी पर्यंत शाळा सुरु करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. त्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी २२ तारखेपर्यंत  करण्याचं आदेश देण्यात आले असून त्यासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात आज सकाळपासून हजारो शिक्षकांची कोरोना चाचणी करुन घेण्यासाठी गर्दी उसळली आहे.

धुळे जिल्हा रुग्णालयात नाव नोंदणी केस पेपर घेण्यासाठी त्यानंतर प्रत्यक्ष चाचणीसाठी शिक्षक, शिक्षीकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे. नववी ते बारावी पर्यंतच्या शिक्षकांनाच चाचणी करुन घेण्याची गरज असतांना प्राथमिक शाळांचे सुध्दा शिक्षक चाचणी करुन घेण्यासाठी गर्दी करत आहेत.

काल जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी रेकॉर्ड ब्रेक ७४८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर आज त्याहून जास्त शिक्षकांची आणि कर्मचार्यांीची तपासणीसाठी गर्दी झाली आहे. साक्री इथं १५०, शिरपूर येथे १०६, दोंडाईचा येथे ३९० असे एक हजार ३६४ शिक्षकांचे स्वॅब नमूने तपासणीसाठी घेतले गेल्याची माहिती जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ.विशाल पाटील यांनी दिली आहे.