देशात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांचं प्रमाण ९३ पूर्णांक ५८ टक्के

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणू संसर्गातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण ९३ पूर्णांक ५८ टक्के इतकं झालं आहे. गेल्या चोवीस तासात ४८ हजार ४९३ हून अधिक रुग्ण उपचारानंतर बरे झाले, देशात कोरोना विषाणू संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ८३ लाख ८३ हजार ६०३ झाली आहे.

  देशात या संसर्गाच्या रुग्णांची एकूण संख्या ८९ लाख ५८ हजार चारशे चौऱ्यांऐंशी झाली आहे. सध्या देशात ४ लाख ४३ हजार ३०३ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.