ग्रामीण भागातले उद्योग बळकट करण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रामीण भागातले उद्योग बळकट करणं आवश्यक असल्याचं,केंद्रीय सुक्ष्म लघू आणिमध्यम उद्योग एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं भारतीयजनता पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.


शहर आणि जिल्ह्यात प्रत्येकी दहा हजार आपणरोजगार उपलब्ध करून देऊ शकू काय, यासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत,सेवा आणि विकासाचं राजकारणकरून आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करावी, असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. ग्रामीण भागातले लोक रोजगारासाठीशहराकडे येतात त्यांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध झाला,तर ते शहराकडे धाव घेणारनाहीत, याकडे गडकरीयांनी लक्ष वेधलं.