प्रामाणिकपणे आणि विकासाभिमुख कामांनाच जनतेचा कौल मिळतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रामाणिकपणे आणि विकासाभिमुख कामे केली की जनतेचा भरभरून आशिर्वाद मिळतो हे बिहार विधानसभा आणि अन्य राज्यातल्या पोटनिवडणुकांमधून सिद्ध झाले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बिहार विधानसभेतल्या यशानंतर काल दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना उद्देशून ते बोलत होते.

भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राबवलेल्या कल्याणकारी योजना आणि विकास कामांमुळेच जनतेचा विश्वास आणि लोभ मिळत असल्याचे ते म्हणाले. लोकशाहीच्या या उत्सवात सामील होऊन एन.डी.ए.ला कौल दिल्याबद्दल त्यांनी विविध राज्यातल्या जनतेचे आभार मानले; तसेच कोविड काळात सर्व नियम पाळत निवडणुका घेतल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासनाचेही आभार मानले.