राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१ पूर्णांक ९६ शतांश टक्केनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात काल १० हजार ७६९ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १५ लाख ८८ हजार ९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९१ पूर्णांक ९६ शतांश टक्के झालं आहे.काल आणखी तीन हजार ७९१ कोरोना बाधितांची नोंद झाली, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १७ लाख २६ हजार ९२६ झाली आहे. सध्या ९२ हजार ४६१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यभरात काल ४६ जणांचा मृत्यू झाला. या विषाणू संसर्गामुळे आतापर्यंत ४५ हजार ४३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान मुंबईत काल 1 हजार 57 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.  आतापर्यंत 2 लाख 38 हजार 86 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 535 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या 2 लाख 65 हजार 671 झाली आहे. मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी 233 दिवसांवर गेला आहे. सध्या 16 हजार 374 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. काल 19 रुग्णांचा मृत्यू झाला. असून एकूण  मृतांचा आकडा 10 हजार 481 वर पोचला आहे.