कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे केंद्र सरकारचे सर्व राज्यांना निर्देश


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीकरणावर लक्ष ठेवण्यासाठी आणि समन्वय राखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यांना दिले आहेत. याचबरोबर लसीकरणाबाबत अफवा पसरु नयेत आणि अंमलबजावणी सुलभपणे व्हावी, यासाठी समाज माध्यमांवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आले आहेत.

  आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस सर्वात आधी दिली जाणार असू त्यानंतर इतर गटांना या मोहिमेत सामावून घेतलं जाणार आहे. केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना याबाबत एक पत्र लिहून तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत.