कोरोना संपला नाही हे लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करावं - महसूल राज्यमंत्री


मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनान कोरोना काळात केलेलं काम प्रशंसनीय असून कोरोनाला बऱ्यापैकी प्रतिबंध केला असला तरीही कोरोना अजून संपला नाही हे लक्षात घेऊन सर्वच यंत्रणांनी समन्वय साधून काम करावं अशा सूचना महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.

  सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असलेल्या महसूल राज्यमंत्र्यांनी कुडाळ इथं अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जागा, परतीच्या पावसान झालेल नुकसान, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे रस्ते, माझे कुटुंब, माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण, वाळू लिलाव याबाबतचा आढावा सत्तार यांनी घेतला. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक उपस्थित होते.