खरीप हंगामात केंद्र सरकारकडून आत्तापर्यंत ११ राज्यांमध्ये २४९ लाख मेट्रिक टन धान्यखरेदी.


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२०-२१ सालच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारकडून सध्याच्या किमान हमिभावानुसार धान्य खरेदी सुरु ठेवली आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश यांसह ११ राज्यातून जवळपास २४९ लाख मेट्रिक टन धन्य खरेदी करण्यात आली असून, एकट्या पंजाब राज्यातून अंदाजे ११७६ लाख मेट्रिक टन धान्य खरेदी करण्यात आलेली आहे.

या खरीप हंगामासाठी सरकारने आतापर्यंत हमिभावानुसार, सुमारे ४६ हजार १० कोटी रूपयांची धान्य खरेदी केली आहे. राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांनुसार, या हंगामात, केंद्र सरकारने महाराष्ट्रासह दहा राज्यांना, हमीभावानुसार, सुमारे ४५ लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे.