पंजाब नॅशनल बँकेला भारतीय रिजर्व्ह बँकेनं ठोठावला १ कोटी रुपयाचा दंड


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिजर्व्ह बँकेनं पंजाब नॅशनल बँकेला १ कोटी रुपये दंड ठोठावला आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून भुतानमधल्या ड्रक पीएनबी बँकेच्या एटीएम शेअरिंग यंत्रणेचा २०१० पासून वापर केला जात होता. त्यासाठी बँकेने रिजर्व्ह बँकेची परवानगी घेतलेली नव्हती.

त्यामुळे पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टिम कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावला आहे.  दरम्यान, पेमेंट सिस्टम ऑपरेट करणाऱ्या ५ कंपन्यांचे सर्टिफिकेट ऑफ ऑथरायझेशन रद्द केल्याचं रिजर्व्ह बँकेनं सांगितलं आहे.