जागतिक पातळीवर कोविड-१९ रूग्णांची संख्या ५१ दशलक्ष २५ हजारावरनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर कोविड-१९ रूग्णांची संख्या ५१ दशलक्ष २५ हजार झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे. पॅसिफिक बेटांवरील वनुआटू या देशामध्ये पहिला कोविड-१९ चा रूग्ण काल आढळून आला आहे. अमेरिकेत काल सलग सातव्या दिवशी विक्रमी नव्या १ लाख ३६ हजार नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली.इंग्लंडमध्ये कोविड मृत्युची संख्या ५० हजार नोंदवली गेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कोविड रूग्णांचा मृत्यू होणारा इंग्लंड युरोप महासंघातील हा पहिला देश आहे. दरम्यान, कोविड लसीकरणासाठी ३०० दशलक्ष मात्रा देण्याविषयी फायझर आणि बायोएनटेक यांच्याशी करार झाल्याचे युरोपियन आयोगाने सांगितले आहे.


रशियातील सार्वभौम संपत्ती निधीने स्पुटनिक-व्ही ही लस कोविड-१९ संसर्गापासून बचाव करण्यासाठी ९२ टक्क्यांपर्यंत परिणामकारक असल्याचे म्हटले आहे. मंगोलियामध्ये काल प्रथमच कोरोना विषाणूचा देशांतर्गत संसर्ग झालेल्या रूग्णाची नोंद झाली आहे. तर हाँगकाँग आणि सिंगापूर या दोन्ही देशांनी २२ नोव्हेंबरपासून ट्रॅव्हल-बबल सुरू करण्याचा निर्णय़ घेतला आहे. 

भारतात कोविड-१९ रूग्णांचा बरे होण्याचा वेग वाढून ९२ पूर्णांक ७९ शतांश टक्के झाला आहे. 


 


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
कॅटरिंग ब्रँड फीस्टलीचा मुंबईत प्रवेश
Image