अमेरिकेत आज अध्यक्ष पदासाठी निवडणूक

मुंबई (वृत्तसंस्था) : अमेरिकेतील अध्यक्ष पदाची निवडणूक आज होत आहे. विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे विरोधक डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी काल अखेरच्या टप्प्यातील प्रचारसभा घेतल्या.

 

सुमारे नऊ कोटी 20 लाख नागरिकांनी यापुर्वीच आपला मतदानाचा हक्क बाजावला असून मतमोजणीला काही काळ उशीर होऊ शकतो असा अंदाज आहे.