जो बायडेन यांची अमेरिकेच्या 46 व्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवड


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :मी आणि कमला हॅरीसवर अमेरिकी जनतेनं दाखवलेला विश्वास हा माझा सन्मान आहे, आणि त्यामुळे मी आणखी नम्र झालो आहे. अमेरिकी जनतेच्या हृदयात लोकशाही खोलवर रुजलेली आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, अशी प्रतिक्रीया अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नीवडणूक जिंकल्यानंतर व्यक्त केली.

बायडन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष असतील. अटीतटीच्या लढतीत बायडेन यांनी बाजी मारली. बायडेन यांना 273 प्रतिनिधी मतं मिळाली, तर ट्रम्प यांना 214 मतं मिळाली. सगळ्या जगाची उत्कंठा शिगेला पोचवणाऱ्या अमेरिकेच्या निवडणुकीचे निकाल अमेरिकेच्या प्रमाणवेळेनुसार काल सकाळी साडेअकरा वाजता अंतिम निकाल जाहीर करण्यात आले.

उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरीस या अमेरिकी इतिहासातल्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष असतील.बायडन यांनी ही निवडणूक अवैध मार्गानं जिंकली असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी  केला , आणि न्यायालयात जाण्याचं सुतोवाच केलं आहे. बायडन आणि हॅरीस हे 20 जानेवारीला शपथ ग्रहण करतील. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जो बिडेन आणि कमला हॅरीस यांचं अभिनंदन केलं आहे.


Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image