पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर मिनी बसचा अपघात


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्यात पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज इथं एक मिनी बस तारळी नदीच्या पुलावरून एक मिनी बस आज पहाटे खाली कोसळली, या अपघातात 5 जण ठार झाले. ही मिनी बस वाशीहून गोव्याला निघाली होती. या अपघातातील मृतांमध्ये एक महिला आणि तीन वर्षांच्या बालकाचा समावेश आहे.

त्यात मधुसुदन नायर, उषा नायर, आणि अदित्य नायर, हे नवी मुंबईतल्या वाशीचे रहिवासी होते, तर साजन नायर, आणि आरव नायर कोपरखैरण्याचे रहिवाशी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.