बंजारा समाजाचे धार्मिक गुरू डॉ.रामराव महाराज यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


मुंबई (वृत्तसंस्था) :बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ.रामराव महाराज यांच्यावर वाशीम जिल्ह्यात पोहरादेवी  येथे आज  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी पोलिसांकडून बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.


  राज्याचे वनमंत्री तसंच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, गृहराज्यमंत्री, वाशिमचे  पालकमंत्री शंभूराज देसाई यांची उपस्थिती होती. खासदार भावना गवळी, खासदार संजय धोत्रे हेही यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेश मधून हजारो भाविक उपस्थित यावेळी  उपस्थित होते. 


  धर्मगुरू डॉ.रामराव महाराज यांच्या निधनानं मानवतेचा वसा जोपासून जनकल्याणासाठी जीवन समर्पित केलेले थोर संत हरपले आहेत आशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.