14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन


पुणे : अनाथ मुले जात प्रमाणपत्र नसल्याने अनेक शासकीय लाभांपासून वंचित राहत होती. त्यासाठी आता महिला व बाल विकास विभागाने बाल न्याय अधिनियमांतर्गत शासकीय अथवा स्वयंसेवी बालगृहात प्रवेशित अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अनाथ प्रमाणपत्र वितरणासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी पुणे या कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात दि. 14 ते 30 नोव्हेंबर दरम्यान अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे.


रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी, मंदिर आदि ठिकाणी बेवारस रित्या सापडलेल्या बालकांना प्रशासनाच्या वतीने बालगृहामध्ये दाखल करण्यात येते. तसेच आई वडिल दोघेही हयात नाहीत तसेच कोणतेही नातेवाईक जबाबदारी घेण्यास तयार नाहीत, अशा बालकांना बालगृहात प्रवेशित करण्यात येते. या मुलांचा सांभाळ, पालन पोषणाबरोबर शैक्षणिक लाभ, विविध शासकीय योजना तसेच शिक्षण पुर्ण करुन बाहेर पडल्यावर नोकरीसाठी जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.


या मुलांची ही गैरसोय टाळण्यासाठी त्यांना अनाथ प्रमाणपत्र मिळणार आहे. अनाथ प्रमाणपत्रासाठी महिला व बाल विभागाकडून काही गोष्टींची खातरजमा करणे आवश्यक आहे. त्यामध्ये बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय अथवा स्वयंसेवी बालगृहात दाखल करण्यात येणा-या मुलांच्या आई वडिलांचा शोध घेवून त्यांच्यापैकी कोणीच हयात नसल्याची खात्री करण्यात येणार आहे. तसे संस्थेच्या अधिक्षकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.


जिल्ह्याच्या बाल कल्याण समिती ही त्या अनाथ बालकांचे जन्म-मृत्युची नोंद, शाळा सोडल्याचा दाखला, प्रवेश झालेला रजिस्टरचा दाखला यापैकी एक दाखल्याच्या आधारे अनाथ असल्याचे प्रमाणित करून देणार आहे. तसेच बालगृह अधिक्षक यांनीही अनाथ असल्याचे प्रमाणित केलेले व इतर सर्व कागदपत्रांची पुर्तता केलेले अर्ज संस्थांनी अनाथ प्रमाणपत्र मिळण्याबाबत प्रस्ताव महिला व बाल विकास अधिकारी, पुणे यांचेकडे सादर करावयाचा आहे. महिला व बाल विकास अधिकारी यांनी सदर प्रस्तावाची छाननी करुन विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास, पुणे विभाग पुणे यांचेकडे पाठवला जाणार आहे. या प्रक्रियेनंतरच अनाथ मुलांना प्रमाणपत्र मिळणार आहे.


त्यामुळे अनाथ मुलांना शैक्षणिक, विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणे सहज शक्य होणार आहे. दरम्यान जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे या कार्यालयाच्या वतीने पुणे जिल्ह्यामध्ये 14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. करीता या कालावधीमध्ये काळजी व सरंक्षणाची गरज असलेल्या बालगृहांनी व अनाथ असलेल्या बालकांनी अनाथ प्रमाणपत्र मिळणेबाबतचा परीपुर्ण प्रस्ताव या कार्यालयास सादर करावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती अश्विनी कांबळे यांनी केलेले आहे.


Popular posts
स्टडी ग्रूपची टीसाइड युनिव्हर्सिटीशी हातमिळवणी
Image
महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे जिल्हा सचिव दशरथ सकट
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image