गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार


नवी दिल्ली : गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरची आणि धानोरा तालुक्याच्या सीमावर्ती भागात कोसमी किसनेली जंगल परिसरात पोलिसांबरोबर आज दुपारी झालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाले. गॅरापत्ती पोलीस मदत केंद्रातले पोलीस आणि सी-६० पथकाचे जवान संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला.

पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता ५ नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.