जागृत नागरिक महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह
• महेश आनंदा लोंढे
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त मा.श्री. श्रावण हार्डीकर यांनी सन 2018 साली मनपाच्या विकास कामात नागरिकांचा सहभाग, याअंतर्गत नागरिकांनी रु. 10 लाखापर्यंतची कामे सुचवावीत असे आवाहन केले होते. त्याला योग्य प्रतिसाद देत जागृत नागरिक महासंघाने दिनांक 12/11/2018 रोजी व्यापक समाजहिताची एकूण 11 कामे सुचवली होती, त्यापैकी मनपा प्रशासनाने 10 कामे मान्य करून त्यांना मंजुरीही दिली.
त्यापैकी एक म्हणजे पिंपळे गुरव येथील श्रीकृष्ण मंदिर ते सृष्टी रोड नियोजित बागेशेजारी सुदर्शन नगर प्रभाग क्रमांक 29 या ठिकाणी महिला व पुरुषांसाठी सुलभ शौचालय उभारणे या भागात कुठेही मनपाचे स्वच्छतागृह नव्हते. त्यामुळे महिला व पुरुषांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. संस्थेने समाजहीताची ही बाब ओळखून या भागात स्वच्छतागृहाची उभारणी करण्याची मागणी केली. मागील दोन वर्षे 'ड' क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभाग व त्यांच्याशी संलग्न विभाग यांच्याशी सततचा पाठपुरवठा करून सदर स्वच्छतागृहाची परिपूर्ण उभारणी करण्यात आली. त्यानंतर आरोग्य विभागाशी चर्चा करून त्याचे आरोग्य विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले.
आम्हाला कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, दिनांक 2 ऑक्टोबर 2020 रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी सदरचे स्वच्छतागृह नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहे. या कामांमध्ये 'ड' क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभाग प्रमुख मा. श्री. देवन्ना गट्टूवार, तसेच आरोग्य विभाग प्रमुख मा. श्री.बेंडाळे यांच्या योग्य भूमिकेतून व मार्गदर्शनाखाली शिवाय श्री.शिर्के आणि श्री.माने यांच्या अथक प्रयत्न व सहकार्यातून सदरच्या स्वच्छतागृहाचे निर्माण कार्य पूर्ण झाले आहे. त्यामुळे या सर्वांचे जागृत नागरिक महासंघातर्फे मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद. शिवाय संस्थेच्या संपूर्ण कार्यकारिणीने सतत पाठपुरवठा केला त्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकले.
अशी माहिती जागृत नागरिक महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक/अध्यक्ष नितीन यादव यांनी साप्ताहिक एकच ध्येयचे सहसंपादक श्री.स्वस्तिक आवटे यांना दिली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.