सुशांत सिंग राजपुतची हत्या नसून आत्महत्या असल्याचं एम्सच्या अहवालात स्पष्ट


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुशांत सिंग राजपुतची हत्या नसून आत्महत्या असल्याचा अहवाल अखील भारतीय आयुर्वीज्ञान परिषद अर्थात, एम्सनं दिला आहे. सीबीआयला सुपूर्द केलेल्या कायदेशीर वैद्यकीय अहवालात हे स्पष्ट करण्यात आलं आहे. सुशांतच्या अंगावर कसल्याही जखमा नसल्याचं या अहवालात नमूद केलं आहे.

राज्य सरकार सीबीआयच्या अहवालाची वाट बघत आहे, त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रीया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. मात्र या प्रकरणात केंद्र सरकारनं राज्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाचं गठन करावं, अशी मागणी राज्य काँग्रेसनं केली आहे.