उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याचा निर्णय येत्या २ दिवसात करु, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन


मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काटगाव इथं भेट देऊन अतिवृष्टिनं झालेल्या पिकांच्या नुकसानीची पहाणी केली. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना खचून जाऊ नका, सरकार तुमच्या पाठिशी आहे, असा धीर दिला. दोन दिवसात नुकसानग्रस्तांना मदतीचा निर्णय जाहिर करू, या शब्दात त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलं.

मंत्रिमंडळ बैठकीत शेतकर्यांसाठी मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं ते पुढे म्हणाले. पावसाच्या तडाख्यानं या भागात होत्याचं नव्हतं केलं, अशी खतं त्यांनी व्यक्त केलं. असंही त्यांनी सांगितलं. सोलापूर, उस्मानाबादनंतर मुख्यमंत्री आता कोकणचा दौरा करणार आहेत.

आज मुख्यमंत्र्यांसमवेत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेही होते. यावेळी सतीश सुरवसे या ग्रामस्थाच्या घराची पडझ़ड झाल्यानं त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी तुळजापूर तालुक्यातल्या अपसिंगा शिवारात अतिवृष्टिनं नुकसान झालेल्या शेतशिवार आणि बाधित क्षेत्राची पहाणी केली.