देशातील कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ९१ टक्के


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ९१ टक्के झाले आहे. देशात या संसर्गाच्या रुग्णांची संख्या ७९ लाख ९० हजार ३२२ झाली असून, यापैकी ७२ लाख ५९ हजार ५०९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे संसर्गमुक्तीचा दर ९० पूर्णांक ८५ शतांश टक्क्यावर पोहोचला आहे. 


सध्या देशात या संसर्गाचे ६ लाख १० हजार ८०३ सक्रीय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख २० हजार १० एवढी झाली आहे. या संसर्गाचा मृत्यूदर दीड टक्के झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने काल दिवसभरात एकूण १० लाख ६६ हजार ७८६ नमुन्यांची कोविड तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण दहा कोटी ५४ लाख ८७ हजार ६८० कोविड चाचण्या झाल्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिली. 


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
कर्ज घेऊन व्यवसाय यशस्वी करणाऱ्या तरुणांची कोरोना संकटग्रस्तांना मदत
Image
पंतप्रधानांनी ‘आरंभ’ या एकात्मिक मुलभूत अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या भागातील भारतीय नागरी सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी साधला संवाद
अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्तपदांसाठी लवकरच पदभरती - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
Image