देशाच्या कृषी निर्यातीत वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  देशातल्या प्रमुख कृषी उत्पादनांची यावर्षीच्या एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यांमधे झालेली निर्यात, मागच्या वर्षीच्या याच काळतल्या निर्यातीपेक्षा  १४ पुर्णांक ८ दशांश टक्क्यानं वाढली अशी माहितीही केंद्रीय कृषी मंत्रलयानं दिली आहे.

  यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या काळात प्रमुख कृषी उत्पादनांची ५३ हजार कोटी रुपयांची निर्यात झाली असं मंत्रालयानं कळवलं आहे. यात भात, गहू आणि साखरेचं प्रमाण सर्वाधिक होतं, तसंच बासमती तांदळाच्य निर्यातीत वर्षभरापूर्वीच्या निर्यातीच्या तुलनेत ८ पूर्णांक २ दशांश टक्क्याची वाढ झाली अशी माहितीही कृषी मंत्रालयानं दिली आहे.

  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या परिणामांतून कृषी निर्यात क्षेत्र सावरत असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.


Popular posts
केंद्र सरकार राज्यात ५-६ लॉजिस्टिक पार्क उभारणार- नितीन गडकरी
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image