कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीताच्या आपत्कालीन उपाय योजनेच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
• महेश आनंदा लोंढे
पुणे : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केलेली असून त्यास दि.31 ऑक्टोबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तसेच टप्पेनिहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्यासाठी ' मिशन बिगन अगेन' बाबत अधिसूचना जाहीर केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेली मार्गदर्शक तत्वे व अधिसूचनेतील परिशिष्ट 1, 2 व 3 मध्ये नमूद केलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याकामी शासन अधिसूचना जारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.
पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात शासन अधिसूचना सुधारणा लागु करण्याबाबत आदेश पारीत करण्यात आल्याचे तसेच सुधारीत आदेश निर्गमित करण्यात आले असून त्यानुसार सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी अशाही सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहेत.
यासंदर्भातील सूचनांनुसार पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आदेशाने दिलेल्या परवानगीनुसार त्यांच्या वेळेत परवानगी राहील.पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत, तसेच पुणे, खडकी व देहूरोड छावणी परिषदेतील या सर्व क्षेत्रामधील सर्व अत्यावश्यक सेवा / औषधे दुकाने / वैद्यकीय सेवा / दवाखाने यापुर्वी दिलेल्या परवानगीनुसार त्यांच्या वेळेत दररोज सुरु राहतील. पुणे.खडकी व देहूरोड छावणी परिषद हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील अत्यावश्यक सेवा दुकानाव्यतिरिक्त इतर वस्तुंची दुकाने, सर्व आस्थापना त्याकरिता निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार सकाळी 9.00 ते रात्री 9.00 या वेळेत खुली राहतील. शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स त्याकरिता निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार सकाळी 9.00 ते रात्री 9.00 पर्यंत सुरु राहतील तथापी त्यामधील सिनेमागृहे बंद राहतील.
याप्रमाणे क्षेत्र वगळता जिल्हयाचे उर्वरित सर्व क्षेत्र ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील अत्यावश्यक सेवा दुकानाव्यतिरिक्त इतर वस्तुंची दुकाने यासर्व आस्थापना त्याकरीता शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार सकाळी 9.00 ते रात्री 9.00 यावेळेत खुली राहतील. यापुर्वीच्या आदेशानुसार देण्यात आलेल्या सर्व उपक्रम व कृतींना परवानगीतील अटी व शर्तीं लागू राहतील. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती , संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतील साथ अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता चे कलम 188 आणि या संदर्भांतील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियम अन्वये योग्य ती कायदेशीर करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कळविले आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.