राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप


मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील डबेवाल्यांना राजभवन येथे सायकल वाटप करण्यात आले. श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात १२ डबेवाल्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सायकलच्या चाव्या देण्यात आल्या.


श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करताना राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले,  परोपकार करण्याची क्षमता ईश्वराने केवळ मनुष्याला दिली आहे, त्याचा माणसाने सदुपयोग केला पाहिजे. आपल्या देशात गरीबात गरीब व्यक्तीमध्ये आपल्या ताटातील अर्धे जेवण दुसऱ्या गरजूला देण्याची भावना आहे. अशा परोपकारी लोकांमुळेच समाज जिवंत राहतो, असे श्री.कोश्यारी यांनी सांगितले.


मुंबईतील सर्व डबेवाले मेहनत करून लोकांना जेवण पोहोचविण्याचे पुण्यकर्म करीत आहेत. चांगले काम करणाऱ्याला ईश्वर नेहमी मदत करीत असतो. आज डबेवाले सायकलवरून फिरत असले तरी त्यांची मुले शिक्षणाच्या माध्यमातून स्वकर्तृत्वावर प्रगती करून मोटार कार व विमानाने फिरतील असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.


श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानचे शुभ्रांशु दिक्षीत यांनी प्रास्ताविक भाषणातून प्रतिष्ठानतर्फे कोरोना काळात केलेल्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. कोरोना काळात अनेक डबेवाल्यांच्या सायकली बंद पडून बिघडल्या व त्यांचा रोजगारही गेला. या सर्वांना पुनश्च रोजगार मिळावा या दृष्टीने सायकल वाटप करण्याचे ठरवले, असे त्यांनी सांगितले.


यावेळी मुंबई डब्बावाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर उपस्थित होते.


Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image