मुंबईत काल दिवसभरात १ हजार २९३ रुग्णं कोरोनामुक्त


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल दिवसभरात १ हजार २९३ रुग्णं कोरोनामुक्त  होऊन  घरी परतले. यामुळे मुंबईत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या २ लाख २३ हजार ५८६ झाली आहे. सध्या मुंबईतलं  कोरोनाबाधित रुग्णं बरे होण्याचं प्रमाण ८८ टक्के इतकं आहे अशी माहिती, आरोग्य विभागानं दिली आहे.

  मुंबईत काल ८०४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचीही नोंद झाली. यामुळे मुंबईतली कोरोनारुग्णांची एकूण संख्या २ लाख ५२ हजार ८५  झाली  आहे. मुंबईत  काल ३७ कोरोनाबाधितांचा  मृत्यू  झाला. यामुळे कोरोनाबळींची  एकूण संख्या १० हजार १४२ झाली आहे. सध्या मुंबईत १७ हजार ८६०  कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.