राज्यातल्या व्यायामशाळा सुरू करायला परवानगीमुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना रूग्ण बरे होण्याचा दर तसंच नव्या रूग्णांच्या नोंदणीच्या दरात घट झाल्यानंतर राज्य सरकारनं राज्यातल्या व्यायामशाळा सुरू करायला परवानगी दिल्यानंतर आजपासून या संदर्भातल्या नियम आणि अटी पाळून अनेक व्यायामशाळा सुरू झाल्या. नव्या नियमांनुसार व्यायामशाळांमध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये किमान ६ फुटांचं अंतर राखणं गरजेचं आहे. तसंच व्यायामशाळांमध्ये येण्या जाण्याचे मार्ग वेगवेगळे असणं गरजेचं आहे. मास्क वापरणं सक्तीचं असून खोकताना किंवा शिंकताना सुरक्षित अंतर राखण्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या बरोबरच एकाच वेळी पूर्ण क्षमतेनं सर्वांना प्रवेश न देता विविध वेळी प्रवेश द्यायचं बंधनही व्यायामशाळा मालकांना घातलं आहे.