महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची पुणे जिल्हा कार्यालयाची लाभार्थी निवड समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पडली पार


पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या, पुणे जिल्हा कार्यालयाची लाभार्थी निवड समितीची बैठक मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीस सदस्य सचिव श्री. डी. ए. काकडे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाचे श्री. डोंगरे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री. सुनील तुपलोंढे, कौशल्य विकास केंद्र श्री. नलावडे उपस्थित होते.


बैठकीत मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती घेतली. जिल्हा कार्यालयाच्या दिलेल्या उद्दिष्टांची माहिती घेतली व उद्दिष्ट साध्य होण्यासाठी काय कारवाई केली, याबाबत माहिती घेतली.


मा. जिल्हाधिकारी यांनी जिल्हा माहिती अधिकाऱ्यामार्फत वर्तमानपत्रातून सर्व योजनांची व्यापक प्रसिद्धी देण्याबाबत सूचना केली. श्री. डोंगरे यांनी तहसील/बी.डी.ओ. या कार्यालयामार्फत योजनांची प्रसिद्ध करण्याची सूचना केली. निवड समितीसमोर वैयक्तिक व्याज परतावा योजनेचे ४४, बीजभांडवल योजनेचे २ व थेट कर्ज योजनेचे ८ कर्ज प्रस्ताव ठेवण्यात आले होते. त्या सर्व प्रस्तावांना संबंधित बँकेकडे व मुख्यालयाकडे योग्य त्या कार्यवाहीसत्व पाठविण्याबाबत मान्यता देण्यात आली.