सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५वी जयंती देशभरात 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४५वी जयंती आज देशभरात 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरी होत आहे. आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी नवी दिल्लीतल्या सरदार पटेलांच्या पुतळ्यावर पुष्पांजली अर्पण करूनत्यांना अभिवादन केलं. यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थितांना एकतेची शपथ दिली.


गुजराथ दौऱ्यावर असलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवाडिया इथे स्टॅच्यू ऑफ युनिटी' वर जाऊन सरदार पटेल यांना अभिवादन केलं. लोह पुरुष वल्लभभाई पटेल हे देशाच्या अखंडतेचे आणि एकात्मतेचे शिल्पकार होते, असं  प्रधानमंत्र्यानी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. 


संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीही सरदार पटेल यांना अभिवादन केलं. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा पुनर्निर्धार करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलंय. 


केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देशवासियांना राष्ट्रीय एकता दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्राच्या एकता आणि अखंडतेसाठी सरदार पटेल यांनी असीम त्याग केला असं ते म्हणाले.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नवी दिल्ली इथल्या पटेल चौकातल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करीत अभिवादन केलं. 


Popular posts
दक्षिणी कमांड खुली ऑनलाईन स्पर्धा
Image
खाताबुकचे 'पगारखाता' अ‍ॅप
Image
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image