पंतप्रधानांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे त्यांच्या निर्णायक यशाबद्दल केले अभिनंदन


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्ड्रन यांना मिळालेल्या निर्णायक यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्वीटर संदेशात पंतप्रधान म्हणाले, “मी पंतप्रधान जेसिंडा आर्ड्रन यांना मिळालेल्या निर्णायक यशाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. गतवर्षी झालेल्या आपल्या भेटीची आठवण आली आणि भारत-न्यूझीलंड यांच्यातील संबंध अधिक उच्च स्तरावर जातील, अशी अपेक्षा करतो.”