राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. २० नोव्हेंबरपासून या परीक्षांना सुरुवात होणार असून, दहावीच्या परीक्षा ५ डिसेंबर पर्यंत तर बारावीच्या सर्वसाधारण विषयांच्या ७ डिसेंबरपर्यंत आणि व्यावसायिक विषयांच्या परीक्षा १० डिसेंबरपर्यंत चालणार आहेत. तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांसह संपूर्ण परीक्षेचं वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.